सोलापूर : पटवर्धन कुरोली गणातील शेतकऱ्यांना मोफत वैरण व बी-बियाणे वाटप
पटवर्धन कुरोली (सोलापूर): सोलापूर जिल्हा परिषद शेष फंडातून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वैरण व बी-बियाणे वाटप करण्यात येणार आहे.माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन कुरोली पंचायत समिती सदस्या सौ. प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी गणातील सर्व गावांमध्ये (आव्हे-तरटगाव, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, पिराची कुरोली, चिंचणी, वाडीकुरोली, शेळवे, देवडे इ.) भेटी देऊन शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेतले.एकूण ९५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फॉर्म भरले असून, ते पशुसंवर्धन विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. आठ दिवसांत बियाणे व वैरण वाटप करण्यात येणार आहे.
आयोजक :
सौ. प्रमिला सोमनाथ झांबरे
पंचायत समिती सदस्या, पटवर्धन कुरोली
सौ. प्रमिला सोमनाथ झांबरे
पंचायत समिती सदस्या, पटवर्धन कुरोली