बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित; ८ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-24 at 5.03.59 PM

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित; ८ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

पुणे/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

WhatsApp Image 2026-06-24 at 5.04.01 PM

महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार बारामती येथे प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रस्तावाबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना ८ जुलै २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरासह आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड या तालुक्यांचा समावेश राहणार आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून प्रशासनिक कामकाज अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने बारामती येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. या संदर्भात नागरिक, सामाजिक संस्था व संबंधित घटकांनी आपली मते, हरकती अथवा सूचना विहित मुदतीत लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रस्तावामुळे बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील नागरिकांना महसूल व प्रशासकीय सेवांसाठी अधिक सुलभता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!