भिगवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न!
(निलेश गायकवाड)
आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भिगवण येथील दुर्गा माता मंदिर परिसरात सुप्रसिद्ध डॉक्टर तथा योग प्रशिक्षक डॉ. पद्मजा खरड यांच्या पद्माज योगा क्लासच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या उपक्रमास नागरिक व बालमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या मा. मेघना बंडगर, पंचायत समिती सदस्या मा. हेमा माडगे, मा. मारुती वनवे, बाळासाहेब पानसरे, दिनेश मारणे, राजेंद्र जमदाडे, संजय सकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले.
योग हे निरोगी जीवनाचे प्रभावी साधन असून, नियमित योगाभ्यासातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपता येते, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक, बालमित्र आणि पद्माज योगा क्लासच्या विद्यार्थ्यांचे.