प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-19 at 4.37.30 PM

प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम

(निलेश गायकवाड)

सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे विविध उपक्रम प्रवीण भैय्या माने मित्रपरिवार, शेटफळगडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. प्रवीण भैय्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी रात्री आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रमही राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सोनाई परिवाराचे संचालक किशोर भैय्या माने यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडापुरी तसेच श्रीनाथ विद्यालय, वडापुरी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरवड येथेही प्रवीण भैय्या माने मित्रपरिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमालाही किशोर भैय्या माने यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधणारे हे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणाचे सामाजिक उपक्रमांमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा तसेच वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रवीण भैय्या माने मित्रपरिवाराने केला आहे.

या उपक्रमांचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. समाजहित आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!