लिनेस क्लबचा स्तुत्य उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260619-WA0560

लिनेस क्लबचा स्तुत्य उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

अमळनेर : विक्की जाधव.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे या उद्देशाने लिनेस क्लबतर्फे येथील प्रताप हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास लिनेस क्लबच्या अध्यक्षा कविता पारख, इन्चार्ज ऑफिसर जास्मिन भरूचा, कॅबिनेट ऑफिसर जया जैन, डॉ. मंजुश्री जैन तसेच शारदा अग्रवाल उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कविता पारख यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यात शाळेला आणखी शैक्षणिक साहित्याची आवश्यकता भासल्यास लिनेस क्लबतर्फे शक्य ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, शैक्षणिक किट तसेच इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पुस्तके वितरित करण्यात आली. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार एस. ए. खांजोडकर यांनी केले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!