रक्तदानातून जपला जातोय क्षत्रियांचा खरा धर्म आधुनिक काळातील हेच खरे क्षत्रिय धर्मपालन : प्रा. डॉ. संजय गिरासे 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260619-WA0455

रक्तदानातून जपला जातोय क्षत्रियांचा खरा धर्म आधुनिक काळातील हेच खरे क्षत्रिय धर्मपालन : प्रा. डॉ. संजीव गिरासे 

अमळनेर : विक्की जाधव.

शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि ऐतिहासिक व्याख्यान यामुळे जन्मोत्सवाला सामाजिक व शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले. महाराणा चौकातील स्मारकस्थळी तैलचित्र पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजातील युवक-युवतींसह अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत शंभरहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन केले. महाराणा प्रताप यांच्या त्याग, पराक्रम आणि जनकल्याणाच्या विचारांना अनुसरून समाजसेवेचे आदर्श उदाहरण देणारा उपक्रम विशेष ठरला. यावर बोलतांना पूर्वी रणांगणात शौर्यासाठी रक्त सांडले जात होते, पण आजच्या युगात रक्तदान करून दुसऱ्याला जीवन देणे हेच खरे क्षत्रिय धर्माचे पालन आहे. महाराणा प्रतापांचा त्याग, पराक्रम आणि मानवतेचा वारसा रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्यातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आजची पिढी करत आहे.”

प्रा. डॉ. संजीव गिरासे.

सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हळदीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत इतिहासातील प्रेरणादायी घटनांना उजाळा दिला. आमदार अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला समाजबांधव, महिला भगिनी आणि युवकांची मोठी उपस्थिती लाभली. महाराणा प्रताप यांचा शौर्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!