बारामती पोलिसांचा मोठा दणका! अवैध फटाका वाहतुकीचा पर्दाफाश; लाखोंचा माल जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-17 at 8.08.14 PM

बारामती पोलिसांचा मोठा दणका! अवैध फटाका वाहतुकीचा पर्दाफाश; लाखोंचा माल जप्त

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

स्फोटक पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार वाहनांमधून परवान्याविना वाहतूक करण्यात येत असलेले विविध प्रकारचे फटाके जप्त केले. या कारवाईत एकूण ७ लाख ७९ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८७ तसेच मोटार वाहन कायदा कलम ६६, १९२ आणि १९०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जून रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मौजे मळद (ता. बारामती) येथील फलटण-बारामती मार्गावरील चिंचबन परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी चार वेगवेगळ्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान संबंधित वाहनचालकांकडे स्फोटक पदार्थांची वाहतूक अथवा साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहने व त्यातील फटाक्यांचा साठा जप्त केला.

⚫चार वाहनांसह मोठा साठा जप्त

कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन तीनचाकी पेंजो, एक महिंद्रा विरो आणि एक अशोक लेलँड छोटा हत्ती यांचा समावेश आहे.

🔶एमएच-४२-एम-१३६६ या पेंजो वाहनातून AK-30 Shots, Sweet 60 Multi Colour Shots, Sparkle 120 Shots आणि Invisible 240 Shots या प्रकारचे फटाके जप्त करण्यात आले. वाहनासह या मुद्देमालाची किंमत १ लाख ३३ हजार ५०० रुपये आहे.

🔷एमएच-४५-७२६२ या पेंजो वाहनातून Thunder Multi Colour, Pearl Manthan, AK-30 Shots, Champions Multi Colour, Hukum Multi Colour आणि Chellams Manthan या प्रकारचे फटाके जप्त करण्यात आले असून वाहनासह एकूण किंमत १ लाख २६ हजार ३०० रुपये इतकी आहे.

🔶एमएच-५३-बी-७७७३ या महिंद्रा विरो वाहनातून ताजमहाल सिल्व्हर टेक बिजली क्रॅकर्स, ताजमहाल लॉयन, ताजमहाल किंग आणि ताजमहाल गोल्ड या प्रकारचे फटाके आढळून आले. वाहनासह एकूण किंमत २ लाख ७९ हजार ८२८ रुपये आहे.

🔷तसेच एमएच-४२-एक्यू-४९२४ या अशोक लेलँड छोटा हत्ती वाहनातून 24 Deluxe, Imperial Red Bijli या विविध प्रकारच्या फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला. या वाहनासह एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.

🟢चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सदाशिव होले (वय ५४, रा. खंडोबानगर, बारामती), संदीप युवराज नेटके (वय ३३, रा. साठेनगर, कसबा बारामती), गणेश बाबासाहेब गरगडे (वय ३२, रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) आणि सुरेश बापूराव गवारे (वय ६०, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

🔴सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब

स्फोटक स्वरूपाच्या फटाक्यांची आवश्यक परवानगीशिवाय वाहतूक केल्यास मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून नियमित तपासण्या व विशेष मोहीम राबविल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

या गुन्ह्याची नोंद बारामती शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!