पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन जल्लोषात स्वागत
अमळनेर : विक्की जाधव.
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प व चॉकलेट टॉफी देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शाळेचे प्रांगण आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्या, स्वागत फलक, तोरणे आणि फुग्यांच्या कमानींनी सजविण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विशेष सेल्फी पॉईंटची निर्मिती करण्यात आल्याने शाळेचा पहिला दिवस आनंदोत्सवात साजरा झाला.नर्सरी विविध वर्गांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापक जे. एस. देवरे व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करून शाळेविषयी आपुलकी निर्माण केली. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व कलात्मक सजावट कलाशिक्षक अनंत बागल यांनी केली. या उपक्रमासाठी चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.