न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; दीड महिन्यात ७७१ वाहनांवर कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260615-WA0894

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; दीड महिन्यात ७७१ वाहनांवर कारवाई

 

अमळनेर : विक्की जाधव.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवणाऱ्यांविरोधात अमळनेर विभागीय पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या दीड महिन्यात अमळनेर, पारोळा, एरंडोल आणि मारवड परिसरात तब्बल ७७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे तसेच वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली आहे.

डीवायएसपी विनायक कोते यांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येऊन कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट कोसळते. त्यामुळे दंड हा शिक्षा देण्याचा नव्हे तर नागरिकांमध्ये शिस्त निर्माण करून अपघात रोखण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवैध प्रवासी वाहतूक, कर्कश सायलेन्सर, दारू पिऊन वाहन चालवणे, भरधाव वेग आणि बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!