न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

अमळनेर स्थानकावर RPF जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260616-WA0621

अमळनेर स्थानकावर RPF जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर 

अमळनेर रेल्वे स्थानक परिसरात आज मध्य रात्री १२ ते १ च्या दरम्यान एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, रेल्वे संरक्षण दल (RPF) मधील जयपाल नामक जवानाने स्वतःवर डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना RPF कार्यालयात घडल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित जवानाने डोक्यात गोळी झाडून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर तात्काळ जखमी जवानाला वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या दरम्यान डॉ. अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळत आहे.

घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!