नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, उपनगराध्यक्षा सौ. संगिता देवरे यांचा हस्ते एकनाथराव बोरसे यांना डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार मिऴाल्याबद्दल सत्कार

शिरपुर : नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी व शिवनपा उपनगराध्यक्षा सौ. संगिता देवरे यांचा हस्ते एकनाथराव बोरसे यांना नुकताच डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार मिऴाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. येथील ओबीसी नेते, सेवानिवृत्त शिक्षक तथा अखिल भारतीय धोबी महासंघ वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे शिरपुर यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यातील आदर्श शिक्षक व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी व शिवनपा उपनगराध्यक्षा सौ. संगिता देवरे यांनी शिरपुरकरांचा वर्तीने एकनाथराव बोरसे यांचा नुकताच सत्कार केला. याप्रसंगी वाघाडी लोकनियुक्त सरपंच किशोर माऴी, परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी, भाजपा व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, प्रसिध्द व्यापारी श्रीनिवास राठी, बारा बलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज शिंपी, स्नेहलता शिंपी, आरपीआय (आठवऴे गट) युवक प्रदेश चिटणीस नरेश गवऴे, बारा बलुतेदार महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष लोहार, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, शिरपुर भाजपा मा. तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी, शिरपुर धोबी समाज माजी शहराध्यक्ष नरेश पवार, भाजपा किसान मोर्चा मा. तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, शिरपुर भाजपा मा. शहर उपाध्यक्ष अविनाश शिंपी, भाजपा भटके विमुक्त आघाडी मा. जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, पत्रकार मनोज भावसार, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माऴी, भाजपा भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे आदि उपस्थित होते. नुकताच पनवेल जि. रायगड येथे एकनाथराव बोरसे यांना पुरस्कार मिऴाला होता.