चार्ज स्विकारताच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची मॉडिफाईड बुलेट सायलेंसर वाहनावर कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-14 at 12.05.26 PM

चार्ज स्विकारताच पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची मॉडिफाईड बुलेट सायलेंसर वाहनावर कारवाई
१९ बुलेट व मोटारसायकली ताब्यात
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड :- दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही बुलेट मोटारसायकल चालकांकडून वाहनांचे मूळ सायलेंसर बदलून (Modified Silencer) मोठा व कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर बसविण्यात आले होते. अशा वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास होत होता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. तक्रारींचा विचार करता PI हेमंत शेडगे यांची दौंड पोलीस स्टेशनकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान एकूण १९ बुलेट व मोटारसायकली ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती संबंधित वाहनांवर बसविण्यात आलेले मॉडिफाईड सायलेंसर काढून टाकण्यात आले व वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित वाहनधारकांना भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर बदल न करण्याबाबत समज देण्यात आली.
दौंड पोलीस स्टेशनमार्फत वाहनधारकांना आवाहन करण्यात आले की, वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करून ध्वनीप्रदूषण निर्माण करू नये. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!