“धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर उद्या महासंग्राम; देशभरातून लाखोंचा लोंढा, सोनम वांगचुक यांची प्रमुख उपस्थिती!”

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260605-WA0711

“धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर उद्या महासंग्राम; देशभरातून लाखोंचा लोंढा, सोनम वांगचुक यांची प्रमुख उपस्थिती!”

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विविध संघटना, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते उद्या ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे भव्य उपोषण व धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात निर्णायक लढ्याची भूमिका घेतली आहे.

या आंदोलनात देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो नव्हे तर लाखो नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्थेतील प्रश्न आणि विविध प्रलंबित मागण्यांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आयोजकांनी दिला आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासनही सतर्क झाले आहे.

विशेष म्हणजे प्रसिद्ध पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे या आंदोलनात प्रमुख उपस्थिती लावणार असल्याने आंदोलनाचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यांच्या सहभागामुळे देशभरातील युवक व विविध सामाजिक संघटनांचे लक्ष उद्याच्या आंदोलनाकडे लागले असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!