करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- उद्या ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ जगभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी करमाळा नगरपरिषदेच्या वतीने विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.
उद्या दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता महावीर उद्यान येथे हा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या उपक्रमाद्वारे शहरात जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प नगरपरिषदेने केला आहे.
या कार्यक्रमासाठी करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी सर्व पत्रकार बांधवांना आणि शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण रक्षणाची ही चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे ही मुख्याधिकारी तपसे यांनी सांगितले.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण उपक्रमाला शोभा वाढवावी, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.