१५ गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद; नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्नही फोल

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-05-27 at 3.23.52 PM

१५ गुन्ह्यांतील फरार आरोपी अखेर जेरबंद; नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्नही फोल

बारामती | प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

बारामती शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी, शिताफीपूर्ण आणि कायदेशीर कारवाई करत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) यास अखेर जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देत फरार असलेला हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत.
१) FIR क्र. 10/2011 – वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400005/2012
२) FIR क्र. 94/2011 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./1600111/2013
३) FIR क्र. 6/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400058/2013
४) FIR क्र. 22/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400040/2013
५) FIR क्र. 20/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400039/2013
६) FIR क्र. 16/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400038/2013
७) FIR क्र. 386/2014 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – R.C.C./16/2016
८) FIR क्र. 429/2014 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./1600624/2015
९) FIR क्र. 15/2016 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./188/2017
१०) FIR क्र. 769/2018 – बारामती शहर पोलीस स्टेशन – सेशन्स केस क्र.126/2019
११) FIR क्र. 1026/2018 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./579/2023
१२) FIR क्र. 155/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./166/2022
१३) FIR क्र. 159/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./453/2021
१४) FIR क्र. 19/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./307/2021
१५) FIR क्र. 128/2021 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – R.C.C./298/2021

संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयाने जमीन मंजूर केल्यानंतर आरोपी सातत्याने न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक पळ काढण्यास सुरुवात केली होती. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा तसेच वॉरंट बजावण्यात येऊनही आरोपी कोणत्याही सुनावणीस हजर राहत नव्हता. परिणामी संबंधित न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते.

अखेर , दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शंकर उर्फ पोक्या आडके हा दशविधी कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने अटक टाळण्यासाठी थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कोणतीही भीती न बाळगता त्याचा पाठलाग सुरूच ठेवला.

नदीतून बाहेर पडत आरोपी जवळील दाट उसाच्या फडात लपला. उंच उसाचे पीक आणि अरुंद पायवाटा यामुळे शोधमोहीम अधिकच कठीण झाली होती. तरीही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संपूर्ण परिसरात कसून शोधमोहीम राबवली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या या थरारक कारवाईदरम्यान उसामध्ये संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर पोलिसांनी परिसराला घेराव घालत आरोपीस ताब्यात घेतले. अनेक वर्षे पोलिस आणि न्यायालयीन यंत्रणेला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या जिद्दीसमोर निष्प्रभ ठरला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावत येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण कारवाईमध्ये न्यायालयीन कागदपत्रे, वॉरंट अंमलबजावणी आणि आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात महिला पोलीस हवालदार सगुना आवटे आणि पोलीस हवालदार उमा कोकरे यांचेही मोलाचे योगदान राहिले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, न्यायालयीन प्रक्रियेपासून फरार होणाऱ्या आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या आरोपींविरुद्ध यापुढेही अशाच धडाकेबाज आणि परिणामकारक कारवाया सुरू राहणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!