बारामतीत साहित्य, संस्कृती आणि प्रतिभेचा अनोखा संगम; साहित्यिक सन्मान सोहळा दिमाखात संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामतीत साहित्य, संस्कृती आणि प्रतिभेचा अनोखा संगम; साहित्यिक सन्मान सोहळा दिमाखात संपन्न…

बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

साहित्य, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने पंचक्रोशी प्रकाशन व भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साहित्यिकांचा सन्मान सोहळा” रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी अभिषेक पॅलेस मंगल कार्यालय, १० फाटा (निरा-बारामती रोड), ता. बारामती येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक आणि नवोदित प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य पंचक्रोशी प्रकाशन सातत्याने करत असून, या उपक्रमातून साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात निमंत्रित कवींचे बहारदार कवी संमेलन पार पडले तसेच पाठ्यपुस्तकातील साहित्यिक, पत्रकार, शिक्षक व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण संचालक तथा माजी अध्यक्ष मराठी समिती, बालभारती मा. श्री. शिवाजी तांबे हे होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, ज्येष्ठ साहित्यिक लेखक, गट शिक्षण अधिकारी श्री संजय जाधव sar बारामती तालुका सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. किरण आळंदीकर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे विशेषाधिकारी मा. श्री. मोगल जाधव, ज्येष्ठ मराठी साहित्यिक मा. बबन पोतदार, गट शिक्षण अधिकारी मा. श्री. संजय जाधव, विशेष अधिकारी बालभारती मा. श्री. संतोष पवार, ग्रामीण मराठी साहित्यिक व पत्रकार मा. अजित काटकर, मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा सौ. वनिता जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. आशादेवी वायाळ, सौ. मेनकताई मगर, तसेच श्री. सचिन ठोंबे व श्री. सागर वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. बाळकृष्ण बावचळ सर व श्री. राहुल शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम. माधुरी सोनवलकर, कवयित्री अलका रसाळ व क्रांतिका वसेकर मॅडम , बाळासो करचे सर यांनी तसेच पंचक्रोशी प्रकाशन व भाग्यलक्ष्मी सोशल फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्यिकांचा गौरव, नवोदितांना प्रेरणा आणि साहित्य संस्कृतीचे संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित हा सोहळा बारामतीच्या सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षवेधी ठरला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!