शिरपूर येथे अखिल भारतीय धोबी महासंघ पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर येथे अखिल भारतीय धोबी महासंघ पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत..

अमळनेर / शिरपूर : विक्की जाधव.

शासकीय विश्रामगृहात दि. २३ मे २०२६ रोजी अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. कृष्णकुमार कनोजिया साहेब यांच्या आगमनानिमित्त स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूर परिट (धोबी) सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत स्वागत केले.

तसेच भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय मुख्य सल्लागार मा. श्री. राजेंद्रशेठ आहेर यांचा धुळे परिट (धोबी) सेवा मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सूर्यवंशी यांनी सत्कार करून स्वागत केले. कार्यक्रमात समाजातील विविध प्रश्न, संघटनात्मक बांधणी तसेच समाज विकासाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी परिट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश संघटक अरुण धोबी तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदू माळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समाज एकजुटीवर भर देत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!