अमळनेर येथे संत शिरोमणी भिमा भोई जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
अमळनेर : विक्की जाधव.
संत शिरोमणी भिमा भोई जयंती भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाभंडाऱ्याचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करण्यात आली.
भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत भक्तीभावाने जयंती उत्सव साजरा केला.
यावेळी सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे आणि भाऊसाहेब महाजन यांचे भोई समाजाच्या वतीने मोलाचे योगदान लाभल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे आणि प्रवीण शिंगाणे यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला असून समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.