आदर्श माध्यमिक विद्यालयाचा निकाल 94% : उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम : विद्यालयात मुलींनी मारली बाजी
(निलेश गायकवाड)
भिगवण ( ता.इंदापूर) येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा
एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मार्च 2026 चा निकाल 94% लागला असून विदयालयाने इयत्ता दहावी च्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे . अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी दिली
आदर्श माध्यमिक विद्यालयातून एस. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2026 साठी एकूण 63 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 94% लागला असून कु. स्नेहल अनिल आटोळे हीने 92.60 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.कु. रिद्धी दिपक कदम हीने 89.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. सादिया शाहिद शेख हीने 88.80 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. 19 विद्यार्थ्यांनी Distinction , 20 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 18 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे , अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे व संस्थेच्या सर्व संचालकांनी अभिनंदन केले.