विरवाडी-मदनवाडी माध्यमिक पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलींनीच आपले नाव कोरले; निकालाची गौरवशाली परंपरा कायम!

अपनी भाषा में पढ़े! Translate

विरवाडी-मदनवाडी माध्यमिक पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलींनीच आपले नाव कोरले; निकालाची गौरवशाली परंपरा कायम!

(निलेश गायकवाड)

इंदापूर
तालुक्यातील माध्यमिक विद्यालय विरवाडी-मदनवाडी या विद्यालयाने मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९७.५०% लागला असून, सालाबादप्रमाणे याही वर्षी विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यशस्वीरीत्या कायम राखली आहे.

गुणवत्ता यादीत मुलींचाच डंका!
या वर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता यादीत मुलींनी बाजी मारली असून, पहिल्या तिन्ही क्रमांकांवर मुलींनीच आपले नाव कोरले आहे. अशी माहिती विद्यालया च्या मुख्याध्यापिका श्रीमती ढवान एस के यांनी दिली यशस्वी विद्यार्थ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

प्रथम क्रमांक: तन्वी गणेश ढाळे (८६.६०%)

द्वितीय क्रमांक: अनुष्का तुषार कुंभार (८१.२०%)

तृतीय क्रमांक: ज्ञानेश्वरी बापू बंडगर (७९.८०%)

परिसरात आनंदाचे वातावरण
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे विरवाडी आणि मदनवाडी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक वृंदाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष नानासाहेब बंडगर व सचिव अनिल तांबे व संस्था सदस्य .शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!