“यात्रे उत्सव दरम्यान अमळनेरकरंच्या भावांनाशी खेळ की विकासाचा दिखावा? अमळनेर नगरपरिषद वादाच्या भोवऱ्यात”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“यात्रे उत्सव दरम्यान अमळनेरकरंच्या भावांनाशी खेळ की विकासाचा दिखावा? अमळनेर नगरपरिषद वादाच्या भोवऱ्यात”

 

अमळनेर : विक्की जाधव.

धार्मिक विशेष महत्व असलेला महाराष्ट्रातील प्रख्यात दोनशे वर्षांची परंपरा असलेला अमळनेर रथोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला असला, तरी या उत्सवाच्या निमित्ताने अमळनेर नगरपरिषद आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रथ मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी आणि डांबरीकरणासाठी विशेष निधी मंजूर केल्याचा दावा करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अर्धवटच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे “निधी गेला कुठे?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पैलाड भागातील फर्ची रोडपासून मांगवाडा परिसरापर्यंत रस्त्यावर केवळ खडी आणि कच टाकून काम पूर्ण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

डांबरीकरण न करता काम अर्ध्यावर सोडल्यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. नगरपरिषदेने पूर्ण निधी खर्च झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष काम पाहता हा दावा फोल ठरत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

दरम्यान. या रस्त्यावर पुन्हा नव्याने काम करण्यासाठी आणखी नियोजित 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती समोर येताच, संतापाचा पारा आणखी चढला आहे. एकाच रस्त्यावर वारंवार पैसा खर्च होणार असतील, तर हा विकास आहे की आर्थिक गैरव्यवहार, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

याचा सर्वाधिक फटका रथ आणि पालखी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या असंख्य भाविकांना बसला. प.पू. प्रसाद महाराज आणि पालखी सोबत हजारो भक्त अनवाणी पायाने चालत असताना, या अपूर्ण रस्त्यांवरील खडी आणि कच पायात टोचल्याने अनेकांना अक्षरशः इजा झाली. धार्मिक उत्सवात अशा प्रकारे भाविकांना त्रास होणे, ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना, “जर फक्त पैसा कमवायचा असेल तर व्यवसाय करा, पण लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका,” असा संतप्त सूर लावला. नगरपरिषदेच्या कारभारामुळे अमळनेरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अपमान झाल्याची टीका देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, यात्रेपूर्वीच अमळनेर न. पा. च्या काही ठेकेदारांकडून यात्रेकरूंना लुटण्याचा प्रकार होणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत पैलाड भागातील एका सामाजिक कार्यकर्त्याने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला होता; मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, यात्रेकरूंमध्ये मानसिक त्रास आणि अस्वस्थता निर्माण झाली होती. 

अखेर बाहेरगावाहून आलेल्या व्यावसायिक यात्रेकरूंनी प.पू. प्रसाद महाराज यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला. यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांची बंद खोलीत कानउघडणी झाल्याची माहिती समोर आली. या दबावानंतर नगरपरिषदेनें जुलमी पद्धतीने दिलेला यात्रेचा ठेका रद्द करावा लागला. या सर्व घटनांमुळे अमळनेरमध्ये प्रशासनाविषयी नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!