एपीआय गिरिजा म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

1

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्समध्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नैतिक मूल्यांच्या संवर्धनासाठी विशेष अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एपीआय गिरिजा म्हस्के, मंगेश पवार आणि श्रीमती इंगोले उपस्थित होत्या. या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे शरिरावर व समाजावर होणारे घातक दुष्परिणाम, मोबाईलचा अतिवापर, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने उद्भवणाऱ्या समस्या आणि रस्ते वाहतुकीचे नियम याविषयी सविस्तर व व्यावहारिक माहिती दिली.

मार्गदर्शन करताना एपीआय गिरिजा म्हस्के यांनी सांगितले की, “वयात येताना मुले कळत-नकळत वाईट सवयींकडे वहावत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य याची अचूक जाणीव विद्यार्थ्यांना योग्य वयातच होणे अत्यंत गरजेचे आहे.” व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील विविध शंका व प्रश्न विचारले, ज्यांची समर्पक उत्तरे म्हस्के यांनी दिली.

शाळेच्या सर्वेसर्वा सुनिता देवी यांच्या संकल्पनेतून अशा जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्याचा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!