“रस्त्याच्या कडेचे मातीचे ढीगरे तसेच, PWD बिले काढण्यात व्यस्त” – ग्रामस्थ संतप्त, पावसात अपघातांची भीती
(निलेश गायकवाड)
भिगवण बारामती किव्हा राशीन रस्ता रुंदीकरण किंवा दुरुस्तीचे काम झाल्यावर वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला मातीचे ढीगरे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप उचलत नाहीत. मात्र त्याच रस्त्याची बिले काढण्यात विभाग मात्र आघाडीवर आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नेमकी समस्या काय?
गेल्या काही वर्षपासून झालेल्या रस्त्याच्या कामानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठे मातीचे ढीगरे मदनवाडी चौकात पडून आहेत. पावसाळा सुरू होताच या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचत आहे आणि चिखल होत आहे.

अपघाताचा धोका वाढला
1. पाणी साचल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत
2. रस्ता अरुंद झाला – ढिगाऱ्यांमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना जागा कमी पडत आहे
3. रात्रीच्या वेळी ढीगरे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे
ग्रामस्थांचा आरोप
“आम्ही अनेकदा PWD कार्यालयात तक्रार केली. पण अधिकारी फक्त आश्वासन देतात. काम झाले आहे असे दाखवून बिले मात्र वेळेवर निघतात. लोकांच्या सुरक्षेशी खेळ चालला आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष
कामाच्या ठिकाणी कोणताही सूचना फलक नाही, ना सुरक्षा उपाय. पावसाळ्यात माती वाहून जाऊन गटारेही तुंबत आहेत. ग्रामस्थांचा प्रश्न आहे की, “कामाचा दर्जा तपासल्याशिवाय आणि रस्ता पूर्ण साफ केल्याशिवाय बिले कशी मंजूर होतात?”
मागणी
तातडीने रस्त्याच्या कडेचे सर्व मातीचे ढीगरे उचलून पाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.