‘सहकार्य करा’ म्हणणारे नगराध्यक्ष आता कुठे आहेत जळगाव अमळनेर की मुंबई? अमळनेरकरांच्या प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण ?”

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000cb708208ac25d984459d499b

‘सहकार्य करा’ म्हणणारे नगराध्यक्ष आता कुठे आहेत जळगाव अमळनेर की मुंबई? अमळनेरकरांच्या प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण ?”

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शहरावर एकामागून एक संकटे कोसळत असताना नगरपरिषदेची भूमिका मात्र अद्यापही मौनाचीच असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी शिरून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्या संकटातून शहर अद्याप पूर्णपणे सावरलेले नसतानाच आता मुख्य पाईपलाईन फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा गंभीर परिस्थितीत नगरपरिषदेने पत्रकार परिषद घेऊन नेमकी परिस्थिती काय, पाईपलाईन कशी फुटली, दुरुस्तीला किती वेळ लागणार, पर्यायी पाणीपुरवठ्याची काय व्यवस्था आहे आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत अधिकृत माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने शहरभर विविध चर्चा रंगू लागल्या असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात नगरपरिषदेची भूमिका जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. परिणामी, नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत.

विशेष म्हणजे, आपत्तीच्या या काळात शहरातील पत्रकार प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून सातत्याने काम करत आहेत. नागरिकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती पोहोचविण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडत असताना नगरपरिषदेने पत्रकार परिषद घेण्याऐवजी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच पत्रकार आणि विरोधकांच्या सहकार्याची आठवण होणे, तर दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीच्या माध्यमांवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

अमळनेरकरांसाठी पाणीटंचाईचा हा पहिलाच अनुभव नाही. यापूर्वी भर उन्हाळ्यातही शहरातील अनेक भागांना दीर्घकाळ पाणी मिळाले नव्हते. यात्रेकरूंनाही पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नळातून दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नगरपरिषदेच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरावर संकटे येत असताना प्रशासन नेमके कुठे आहे? पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्यास नेमका अडथळा काय? अमळनेरकरांना आश्वासने नव्हे, तर ठोस कृती आणि पारदर्शक माहिती अपेक्षित आहे. आता तरी नगरपरिषद अधिकृत भूमिका स्पष्ट करून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!