अमळनेर तहसीलमध्ये भ्रष्टाचार? ACB च्या कारवाईनंतरही तहसीलदार मोकळेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला प्रश्न उपस्थित.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तहसीलमध्ये भ्रष्टाचार? ACB च्या कारवाईनंतरही तहसीलदार मोकळेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला प्रश्न उपस्थित.

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करून दोन व्यक्तींना अटक केल्यानंतरही तहसीलदारांवर कोणतीही ठोस कारवाई का होत नाही, असा संतप्त प्रश्न आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे.

संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ACB ने सापळा रचून कारवाई केली. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कारवाई न होता ते मोकळेपणाने फिरत असल्याने सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती अनुदान, पिकविमा, फार्म आयडी, महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे प्रलंबित असून नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार उघडकीस येऊनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने “न्याय कुठे आहे?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. संघटनेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.

या संपूर्ण प्रकरणामुळे अमळनेर तहसील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून येत्या काळात शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!