अमळनेर – जळोद बससेवा सुरू करण्यासाठी मनसेकडून आगर प्रमुखांना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर – जळोद बससेवा सुरू करण्यासाठी मनसेकडून आगर प्रमुखांना निवेदन

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील अमळगाव गांधीली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना वाहतूक सुविधेअभावी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अमळनेर ते जळोद तसेच अमळगाव गांधीली मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगर प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लासूर बस अमळगाव गांधीली येथे थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण जात आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर ते जळोद दरम्यान सकाळी ८ वाजता विशेष बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, शहर उपाध्यक्ष जय बोरसे तसेच मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!