महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघ, कोकणचा प्रथम भव्य राज्यस्तरीय मेळावा भव्य रूपाने संपन्न!

रोहा (रायगड): महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघ, कोकणच्या इतिहासात एक स्वर्णिम अध्याय लिहिला गेला. रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी डॉ. चिंतामणराव द्वा. देशमुख शहर सभागृह, रोहा नगरपरिषद समोर, मु. पो. रोहा, जि. रायगड येथे कोकण परीट (धोबी) मडवळ समाजाचा प्रथम भव्य राज्यस्तरीय मेळावा अत्यंत उत्साहात आणि भव्य रूपाने संपन्न झाला.मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते:अ.भा. (धोबी) महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री. कृष्णकुमार कनोजिया अ.भा. (धोबी) महासंघ वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. एकनाथराव बोरसे अ.भा. (धोबी) महासंघ राष्ट्रीय मार्गदर्शक श्री. राजेन्द्र शेठ आहरे
महाराष्ट्र प्रदेश परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष श्री. खंडेराव कडलक महाराष्ट्र प्रदेश परीट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक श्री. अरुण धोबी
लॉन्ड्री धारक संघटना व प्रदेश परीट (धोबी) सेवा मंडळ अध्यक्ष श्री. गोविंद राऊत
कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून श्री. शांताराम (भाऊ) सहदेव कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघ यांनी केले. कार्यक्रमात अ.भा. महासंघाचे वरिष्ठ नेते श्री. एकनाथराव बोरसे व प्रदेशाध्यक्ष श्री. खंडेराव कडलक यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले.हा मेळावा कोकणातील परीट (धोबी) मडवळ समाजाच्या एकीकरण, संघटनात्मक बळकटीकरण आणि भविष्यातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
