आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात; आज सोडत ऑनलाईन पद्धतीने.
मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या मार्फत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून पालकांचे लक्ष आता सोडतीकडे लागले आहे.

या सोडत प्रक्रियेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन, इंटरनेट सुविधा, बैठक व्यवस्था तसेच उपस्थित मुलांसाठी स्वागत व अल्पोपहार याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पत्रकार, संस्थाचालक, सामाजिक संघटना व पालक यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने सोडत प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले असून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.