July 1, 2025 5:04 am

युवासेनायुवतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी Good Touch -Bad Touch समुपदेश कार्यक्रम शिबीर चंद्रपूर विधानसभा युवासेना युवती,

अपनी भाषा में पढ़े! Translate

युवासेनायुवतीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी Good Touch -Bad Touch समुपदेश कार्यक्रम शिबीर चंद्रपूर विधानसभा युवासेना युवती,
युवासेना प्रमुख मंत्री महोदय श्रीआदित्यठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव #श्रीवरुणजीसरदेसाई साहेबयांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौशितलताईदेवरुखकरशेठ यांच्या संकल्पनेतुन युवासेनायुवती चंद्रपूर जिल्हा विस्तारक सौतृष्णाताई गुजर ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी गिर्हे,युवासेना जिल्हाप्रमुख प्रा निलेशजी बेलखेडे, यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर विधानसभा येथे #Good Touch_ Bad Touch हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या शाळांच्या १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचे संभाव्य लैंगिक शोषाण रोखण्याकरता अथवा बाल विनयभंगाच्या घटनांना पायबंद घालण्याकरता चांगलास्पर्शवाईटस्पर्श या अतिशय गंभिर समस्येवर समुपदेशनाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्याची व्यापक मोहिम युवासेना युवतींतर्फे राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत हा उपक्रम चंद्रपूर शहरात लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळा #जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर#सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा_सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा येथे घेण्यात आला व सुरूच आहे. विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श ओळखण्याचे प्रशिक्षण वक्तव्य करून तसेच प्रोजेक्टर द्वारे देण्यात आले.या उपक्रमात शाळेतील शिक्षक वर्गाने उत्फुर्त प्रतिसाद व सहयोग दिला.
या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूर युवायुवती सेना उपजिल्हा अधिकारी सौ रोहिणी विक्रांत पाटील व बल्लारपूर विधानसभा युवायुवती सेना उपजिल्हा अधिकारी विपष्णा मेश्राम यांच्या समवेत संयोजक म्हणून तालुका युवती अधिकारी प्रगती पड़गेलवार, उपतालुका युवती अधिकारी काजल बुटले, तालुका चिटणीस प्रियंका जगताप शहर चिटणीस आरती समुद्रलवार, शहर चिटणीस धनश्री हेडाऊ, उपशाखा प्रमुख संतुष्टी बुटले यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे : सहायक अध्यापक सौ .सुनीताताई अडबाले मॅडम होत्या तसेच कार्यक्रमाच्या वक्ता म्हणून इंजीनिअर , आय टी आय लेक्चरर सौ. रोहिणी विक्रांत पाटील होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!