दादमहाल वॉर्ड प्रभागात जागतिक महिला दिन साजरा
प्रतिनिधी-विजय केळझरकर
चंद्रपुर-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन हनुमान शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ तर्फे दादमहाल वॉर्ड परिसरात हनुमान खिडकी येथील पटांगणावर आयोजन करण्यात आले.या कार्यक्रम क्षणी प्रमुख स्थानी योग शिक्षिका सौ.सुचिताताई नवघरे,
सौ.मंजुताई नांदलवार,आणि आरोग्य परिचारिका कु.दीपाली संजय वांढरे यांच्या हस्ते दिपप्रजवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.महिला दिन निमित्याने प्रभागातील अश्या काही महिला ज्यांचा घरी बिकट परिस्थिती असता ते खचून न जाता कुटुंब जीवन जगण्याची झुंज स्वीकारून,सक्षम महिला म्हणुन परिवार तथा समाजात अस्तित्व निर्माण करणारी महिला म्हणुन कविता प्रशांत लठ्ठे,सुमन चांदेकर यांचा सत्कार करण्यात आले.आणि सोबतच परिसरात उत्कृष्ट कामगिरी बजावण्याऱ्या महिला आणि समाजासाठी खारीचा वाटा असणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला मान देण्यात आले.यामध्ये कोरोना संकटात लॉकडाउन काळात संतोषी महिला बचत गट यांनी ही गणेश रामगुंडेवार यांचा नेतृत्वाखाली 46 दिवस अविरत अन्नदान सेवेमध्ये आपण पण समाजाचे घटक आहोत या भूमिकेतून आपला सामाजिक कर्तव्य म्हणून खारीचा वाटा देऊ करणाऱ्या बचत गट मधील प्रमुखांचे यावेळी सत्कार करण्यात आले,सोबतच परिसरातील श्रुष्टी अलेवार,अनम शमी खान,परी मनोज पोतनवार यांनी महिला वर आधारित गीत सादर केले,तसेच पुनम आमवार ताईं,वर्षा ताई अहिल्यापुरम तर्फे देखील महिला गीत गायन सादर करण्यात आले.परिसरातील जेष्ठ महिला म्हणुन श्रीमती कमलाबाई पोतनवार यांचे सौ.आक्केवार काकु,आणि सुंदराबाई चहारे यांचा हस्ते सत्कार करण्यात आले,महिला म्हटलं तर चूल आणि मूल एवढीच ओळख न ठेवता आजच्या महिलांनी विविध सामाजिक उपक्रमांत भाग घेऊन आपले विशेष स्थान निर्माण करावे असे मार्गदर्शन भारतीताई राजु बंडीवार यांचा तर्फे करण्यात आले.

उपस्थित लहान युवतीनी शालेय शिक्षणासोबतच विविध खेळ,कला कौशल्य यामध्ये राज्य-देश पातळीवर येऊन देशाचे प्रतिनिधित्व करावे असे मार्गदर्शन शीतल धकाते ताई यांनी केले.शिवजयंती दिनी उत्कृष्ट शिवगीत गायन केल्याबद्दल महिला दिनी सौ.रश्मी हिवरे ताई यांचे देखील या क्षणी सत्कार करण्यात आले.उपस्थित महिला व पाहुण्या तर्फे भारतरत्न लता मंगेशकर आणि अनाथांची माय सिंधू ताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सम्पूर्ण संकल्पना व सूत्रसंचालन प्राची ताई नांदलवार तर्फे करण्यात आले.उपस्थितांचे आभार प्रदर्शन मोहन मंचलवार यांनी केले.सोबतच आयोजन आणि व्यवस्था,कार्यक्रम उत्तम रित्या पूर्णत्वास नेण्यासाठी हनुमान शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ चे सदस्य शैलेश इंगोले,गणेश रामगुंडेवार,आशिष अलचावार,सुमित आंबटवार,जय निखारे,ओम मंचलवार,सचिन कथलकर,योमेश पेदूरवार,कृष्णा चहारे,विक्की अहिल्यापुरम,प्रतीक बनकर,पियुष बोबाटे,सुजल नागापूरे,गोलू लांजेकर,चेतन कामनवार,विपीन येंगलवार यांचे सहकार्य लाभले.