अमळनेरच्या राजकारणातील तरुण चेहरा सुयोग भाऊ धनगर यांना शुभेच्छा.
अमळनेर नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक १२ चे कार्यक्षम, तडफदार आणि लोकाभिमुख नगरसेवक सुयोग भाऊ धनगर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. आपल्या धडाडीच्या नेतृत्वाने आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने त्यांनी अल्पावधीतच नागरिकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिसरातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा, नागरिकांच्या अडचणींना तत्पर प्रतिसाद आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्य यामुळे ते तरुणांमध्ये प्रेरणास्थान ठरत आहेत.सुयोग भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

येणाऱ्या काळातही त्यांनी अशाच जोमाने जनसेवा करत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा, हीच अपेक्षा. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक : समस्त अमळनेर मित्र परिवार