समाजसेवेचा प्रवास ठरला गौरवास्पद दिपक वाल्हे यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान..
अमळनेर : विक्की जाधव.
सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे यांना त्यांच्या गेल्या 22-23 वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेरणा फाऊंडेशन, बदलापूर यांच्या वतीने ‘भारत गौरव पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात दिपक वाल्हे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शिका ताईसाहेब प्रा. डॉ. रंजनीताई लुंगसे यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजीव जैन, अविनाश म्हात्रे, धनाजी पवार, मोहन कदम, माधुरी भोईरकर, रघुनाथ फडके, लोकशाहीर भीमराव ठोंगिरे, राजेश भांगे, अनिल शिंदे व कृष्णा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिपक वाल्हे यांनी सामाजिक, शैक्षणिक, वाचन संस्कृती, समाजसेवा तसेच कोरोना काळात केलेल्या विविध उपक्रमांमुळे समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय व जिल्हास्तरीय असे विविध मिळून 54 पुरस्कार प्राप्त झाले असून कोरोना काळातील कार्यासाठी त्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना दिपक वाल्हे म्हणाले की, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते आणि अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातही समाजासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहे.”