प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांची इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांची इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्षपदी निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेज अमळनेर येथील इतिहास विभाग व संशोधन केंद्र प्रमुख प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी , जळगाव येथील इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी कुलगुरूंनी नामनिर्देशन केले आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष नीरज भाऊ अग्रवाल, उपकार्याध्यक्ष जितेंद्र जैन, डॉ. संदेश गुजराथी, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, हरी भिका वाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळ सदस्य व विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच माजी प्राचार्य डॉ. अरुण जैन, प्राचार्य एस. आर. चौधरी, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनीही शुभेच्छा दिल्या.

याशिवाय सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. विद्यापीठ क्षेत्रातील इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील इतिहासप्रेमी, संशोधक व प्राध्यापकांनीही या निवडीचे स्वागत केले.

प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळ सदस्यांमध्ये कुलगुरूंनी नामनिर्देशित प्रा. डॉ. व्यंकटेश लांब, प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी, प्रा. डॉ. सचितानंद बिच्चेवार, प्रा. डॉ. दत्तात्रय वाघ, प्रा. डॉ. किशोर पाटील यांचा समावेश असून तत्त्वज्ञान केंद्र अमळनेर येथील मानद संचालक प्रा. डॉ. मनिष करंजे, तसेच विभागातील प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. विजय साळुंखे, प्रा. अवीत पाटील, प्रा. प्रसाद मुठे, प्रा. प्रियंका चावडा व सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!