ज्येष्ठ पत्रकार मालवणकर यांच्यावरील हल्लेखोरांचा जामीन अर्ज नामंजूर

अपनी भाषा में पढ़े! Translate

ज्येष्ठ पत्रकार मालवणकर यांच्यावरील हल्लेखोरांचा जामीन अर्ज नामंजूर

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या वर हल्ला करणाऱ्या तीन पैकी दोन हल्लेखोरांच्या वतीने त्यांचे सूत्रधार आबा, भाऊ यांच्यावतीने वकिला मार्फत सत्र न्यायालयात केलेला जामीन अर्ज सत्र न्यान्यालयाने आज नामंजूर करुन सूत्रधार व त्यांची पाठराखण करणाऱ्या पोलीस खाते विशेषतः स. पो. आयुक्त अमोल कोळी यांना जोरदार चपराक लागावली आहे.

गेल्या पाच फेब्रुवारी रोजी भररस्त्यात सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर हे स्कूटरवरून घरी येत असताना तीन हल्लेखोरांनी नंबरप्लेट नसलेल्या स्कूटरवरून येऊन त्यांना रोखून भीषण हल्ला केला होता. ऐनवेळी तेथे लोक जमल्याने हल्लेखोर पळून गेले होते.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या हल्ल्यात दिलीप मालवणकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या डाव्या हाताचा खांदा निखळला होता व दंडाला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. मुंबई येथील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

महापालिका निवडणुकी दरम्यान मालवणकर यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या राजकीय विश्लेषणात्मक लेखाच्या रागातून ऐनवेळी ठाकरे सेनेतून भाजपात गेलेल्या धनंजय बोडारे यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप मालवणकर यांच्या फिर्यादित केला होता. याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे व. पो. निरीक्षक अशोक कोळी हे करीत होत, तेव्हा तपास योग्य दिशेने सुरू होता. परंतू हा तपास स. पो. आयुक्त अमोल कोळी यांच्याकडे जाताच तपासाची दिशा बदलली. तिसरा हल्लेखोर शोधून त्यास अटक करण्याबाबत कमालीची उदासीनता आढलून आली. अटक केलेल्या दोन आरोपीनी सूत्रधाराची नावं उघड करूनही ती दडपून तिसरा हल्लेखोर सापडल्याशिवाय त्याचा उलगडा होणार नाही,असे १६ फेब्रुवारी रोजीच सांगून टाकले. हा हल्ला ५ फेब्रुवारी रोजी होऊनही गेल्या ५७ दिवसात तिसरा हल्लेखोर पोलिसांना न सापडणे, विना नंबरप्लेटची स्कूटर न सापडणे, या वरून स. पो. आयुक्त अमोल कोळी हे सूत्रधारांच्या प्रभावाखाली काम करीत असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा उघड आरोप दिलीप मालवणकर यांनी केला. तसेच त्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग, पोलीस तक्रार प्राधिकरण, पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त आदिना लेखी स्वरूपात केली आहे.

चार्जशीट दाखल करण्यास पुरसा अवधी शिल्लक असताना घाईघाईत चार्जशीट दाखल करुन आरोपीना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न अमोल कोळी यांनी केला. मात्र त्यांच्या या प्रयत्नास अपयश येऊन सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपिंचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणी शासकीय वकिलांसोबत ऍड. अमोल भांदुर्गे व ऍड. सुवर्णा सगळे यांनी आपले कसब पणाला लावले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आत्ता तरी स. पो. आयुक्त अमोल कोळी यांनी सूत्रधाराच्या मोह-माया जालातून मुक्त होऊन निस्पक्षपणे पुढील तपास करावा, अशी अपेक्षा फिर्यादी मालवणकर यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!