इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांची निवड
प्रतिनिधी:- संतोष सोनटक्के
इंदापूर:- नुकताच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. युवक काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष पदाकरिता मिलींद साबळे यांना सर्वाधिक मते मिळाली . त्यामुळे तालुकाभर त्यांच्या चाहत्यांनी व युवक काँग्रेसच्या सदस्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. या निवडणुकीसाठी युवा नेत्यांची तालुका पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीकरिता अध्यक्ष पदाकरिता4 उमेदवार रिंगणात होते. 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सदस्य बनताच ऑनलाईन रीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मत द्यावे लागले होते. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.

मा.श्री.विजयसिंह दादा चौधरी (सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद साबळे यांना विक्रमी मते मिळाली.दि. 7 मार्च ला जाहीर निवडणुकीच्या निकाला नुसार मिलिंद साबळे यांना सर्वाधिक 2227 मते मिळाली आहेत. साबळे यांनी अनेक उमेदवारांना मागे टाकले आहे साबळे यांनी युवकांचा विश्वास जिंकत निवडणुकीत मोठ्या फरकाने मते मिळवली. ही मोठी बाब असल्याचे बोलले जात आहे. ऑनलाईन मतांची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाईचं वाटप करून आनंद साजरा केला.

तालुका युवक काँग्रेसच्या निवडणुकीत एकूण 5052 मतदान झाले .निकाला नुसार तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी मिलिंद साबळे यांना सर्वाधिक मते घेतली आहेत.यांना सर्वाधिक 2227मते मिळाली आहेत. अरूण राऊत यांना 785 मते मिळवून उपअध्यक्ष म्हणुन निवड झाली. त्यांना तालुक्यातून तानाजी भोंग (महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सरचिटणीस ), ऊजेर शेख , राहुल अचरे , भगवानराव पासगे(खजिनदार) , सुफियान जमादार , नितीन राऊत , संतोष शेंडे ,अभिजीत गोरे , संदीप शिंदे , भुषण बोराटे , अक्षय शेलार , सौ. सीमाताई कल्याणकर महिला अध्यक्ष इंदापूर तालुका यांनी शुभेच्छा दिल्या.