तांदुळवाडी येथे विविध कार्यक्रमांनी महिला दिन उत्सवात साजरा…
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी येथे विविध उपक्रम पार पडले.महिला दिनानिमित्त प्रामुख्याने महिलांचा गौरव तसेच खास महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. व कोरोणा काळात गावातील सर्व लोकांची काळजी घेणारे डॉ. कांबळे मॅडम व त्यांच्या टीमचा सन्मान गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व तांदुळवाडी गावाचे सरपंच रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच महिला दिनानिमित्त महिलांचे वकृत्व व संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम, दुतिय व तृतीय क्रमांकाच्या महिलांना ग्रामपंचायत तांदुळवाडी तर्फे बक्षीस देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांना पंचपाळे देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी सज्जनराव जाधव, केंद्रप्रमुख रोहित सोनवणे व डॉक्टर शहा डॉक्टर कांबळे मॅडम तसेच त्यांची सर्व टीम उपस्थित होते.तसेच तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आजिनाथ (बापू) परबत, ग्रामपंचायत सदस्य बापूराव जानराव (गुरुजी), तसेच गट विकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, ग्रामसेवक केवटे भाऊसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सोलापूर जिल्हा परिषदने “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या उप अंतर्गत वस्तीवरील मुलींकरता सायकल बँक सुरू केली असून, मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांच्या अंतर्गत माढा तालुक्यात तांदुळवाडी येथे प्रथम सुरुवात केली असून या उपक्रमातून ग्रामस्थ शिक्षक व पालक यांच्या सहकार्यातून शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. या सायकलीचे वितरण गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, ग्रामसेवक केवटे भाऊसाहेब, पोलीस पाटील पितांबर पाटील, आजिनाथ (बापू) परबत, राजाभाऊ शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विष्णु अनपट, उपाध्यक्ष राधा माने, मुख्याध्यापक मनोहर वास्कर सर व शिक्षक स्टॉप, ग्रा.पं. सदस्य बापूराव जनराव, अतुल गवळी, बळी काळे, राहुल भुई व गावातील महिला भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले. हा कार्यक्रम सुजाता भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
