न्यूज
ब्रेकिंग

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड…

अपनी भाषा में पढ़े! Translate

चोपडा : कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच परभणी येथे झालेल्या राज्याच 12 व सुवर्णं महोत्सवी अधिवेशनात खात्याती अनुरेखक संवर्गाची ट्रेसर्स असोसिएशन (मृ सं ) महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणी वर आठही विभागातून राज्यस्तरावर निवडून आलेले प्रत्येकी एक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व एक विभागीय सचिव यांचे मधून कार्यकारिणी पदाधिकारीची एकमताने निवड करण्यात आली .

त्यात राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे लातूर विभाग , सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार ठाणे विभाग व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे नाशिक विभाग यांची तर पुढीलप्रमाणे कार्यकारिणी सदस्य (राज्य उपाध्यक्ष ) व विभागीय सचिव यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी संघटनेचे कायदेशीर सल्लगार ॲड. चंदूलाल सदाशिव शहा यांनी जाहीर केली.

राज्यस्तरीय कार्यकारिणीतील सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष – पुढील प्रमाणे – लातूर विभाग – नंदकुमार परांडकर कोल्हापूर विभाग- श्यामराव जोशी नागपूर विभाग – राजेंद्र ठाकरे अमरावती विभाग – अनिल खंडारे पुणे विभाग – गजानन शेलार संभाजी नगर (औरंगाबाद) विभाग – विलास मनोहरराव निगवेकर महिला प्रतिनिधी – जयश्री साळवी भिसे विभागीय सचिव – पुढील प्रमाणे – लातूर विभाग – प्रमोद रावके कोल्हापूर विभाग – बाळासाहेब ठोंबरे नागपूर विभाग- अभय चिखले अमरावती विभाग – राजेश बनचरे यांची पुणे विभाग – सौ वैशाली साबळे नाशिक विभाग – वाय डी चव्हाण ठाणे विभाग – सुनील नेतकर संभाजी नगर (औरंगाबाद) विभाग – पद्माकर महामुनी   तसेच ट्रेसर्स असोसिएशन कृषी विभाग महाराष्ट्र राज्य स्तरावरील येणाऱ्या कायदेशीर अडीअडचणी चे निवारण करण्यासाठी सर्वत्र विचार विनिमय करून धुळे येथील अनुरेखक

ॲड. सी एस शहा यांची तहहयात कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाल्याची घोषणा केली.

व वरील प्रमाणे सर्व पदाच्या निवडी झाल्याची अधिकृत घोषणाही यावेळी करण्यात आली. राज्यस्तरा वरील निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश हालिंगे यांनी शाल पुष्पहार व संघटनेची प्रतिमा व स्मरणीका देऊन सर्वांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले व सर्व पदाधिकाऱ्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या नवनियुक्त कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष व अधिवेशनाचे मुख्य संयोजक अंबादास क्षीरसागर परभणी, संघटनेचे माजी सरचिटणीस जयप्रकाश कामडी व माजी विभागीय सचिव प्रकाश कडू नागपूर विभाग, माजी उपाध्यक्ष केशव मदनकर अमरावती, माजी विभागीय सचिव किशोर शास्त्रकार अमरावती, नाशिक विभागाचे माजी विभागीय सचिव किरण पाटील व छत्रपती संभाजी नगरचे माजी उपाध्यक्ष आर आर बनपुरे, कोल्हापूर विभागाचे माजी उपाध्यक्ष तथा कोषाध्यक्ष विलास पोवार, माजी विभागीय सचिव आर एम चव्हाण, महिला प्रतिनिधी तथा माजी उपाध्यक्ष अश्विनीताई कोळेकर, पुणे विभागाचे जिल्हाध्यक्ष रामदास पांढरे, ठाणे विभागाचे माजी उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण व माजी विभागीय सचिव सत्यजित कोमनाक इत्यादींनीही अभिनंदन केले आहे. तसेच सर्व यशस्वी अनुरेखक पदाधिकारी संयोजक इत्यादींचे सर्वत्र अभिनंदनाच वर्षाव होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!