कंडारी खुर्द येथे रब्बी ज्वारी प्रकल्पाची शेती शाळा संपन्न; शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा मंत्र

अपनी भाषा में पढ़े! Translate

कंडारी खुर्द येथे रब्बी ज्वारी प्रकल्पाची शेती शाळा संपन्न; शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा मंत्र

 

अमळनेर : विक्की जाधव.

कंडारी खुर्द येथे आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्पाची शेती शाळा उत्साहात पार पडली. शिवशंभो शेतकरी बचत गटातर्फे राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा वर्ग श्री लोकेश विष्णू पाटील यांच्या शेतात घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी श्री चंद्रकांत ठाकरे व मंडळ कृषी अधिकारी श्री अविनाश खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपकृषी अधिकारी श्री प्रवीण पाटील यांनी रब्बी ज्वारीतील रोग व कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच काढणी पश्चात विक्रीविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲपचा वापर डिजिटल मित्र म्हणून करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहनही करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी श्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा तसेच एकाच पिकावर अवलंबून न राहता कडधान्यांसह इतर पिकांची लागवड करावी, असे सांगितले. याच कार्यक्रमात खरीप हंगामातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत तूर पिकात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नाशिक विभागस्तरीय तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सुवर्णयुग शेतकरी बचत गटाचे अभिनंदन करण्यात आले. गटाचे अध्यक्ष श्री विकास पाटील व सदस्यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी अनिकेत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रफुल सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!