शिवजयंती निमित्त ‘प्रताप’ मध्ये सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न
अमळनेर: विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी सीसीएमसी विभाग व शिखर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.प्रस्तुत परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ दरम्यान संपन्न झाली. ही परीक्षा ५० प्रश्नांची व १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहू पर्यायी स्वरूपाची होती,या परीक्षेसाठी १०९ विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

प्रस्तुत परीक्षेसाठी प्राचार्य डॉ.एच डी जाधव,डॉ.विजय तुंटे, अडव्हॉकेट चंद्रभान पाटील यांनी मार्गदर्शन केले तर यशस्वितेसाठी डॉ.मुकेश भोळे,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.अमोल अहिरे,डॉ.हेमंत पवार,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,विशाल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी आदींनी सहकार्य केले.