तीन वर्षांपासून अंधारात असलेल्या डीडी नगर ते भारत गॅसपर्यंतचा मुख्य रस्ता अखेर प्रकाशमय.
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मधील डीडी नगर ते भारत गॅस, धुळे रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अंधाराच्या छायेत होता. नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर अखेर या रस्त्यावर नवीन दिवाबत्ती बसविण्यात आल्याने परिसर प्रकाशमय झाला आहे. मा. आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या पाठपुराव्यामुळे नगरसेवक रवि पाटील व महेश देशमुख यांनी पुढाकार घेत तात्काळ कार्यवाही केली. मुख्याधिकारी गणेश शिंदे, दिवाबत्ती अभियंता कृणाल महाले व रवि उदयवाल यांच्याशी संपर्क साधून नवीन लाईट बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले.

कामाच्या ठिकाणी नगरसेवक रवि पाटील, महेश देशमुख यांच्यासह दिपक पाटील, धनंजय देसले, रामकृष्ण पाटील, युवराज पाटील, विजय माळी, जिजाबराव पाटील तसेच नगरपरिषद कर्मचारी आबिद शेख, मनोज सोनार, दिपक मद्रासी उपस्थित होते. या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय दूर झाल्याने परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.