टाकरखेड्यात आज रंगणार शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी जाहीर व्याख्यान..
अमळनेर : विक्की जाधव.
टाकरखेडा येथे आज, बुधवार (दि. १८ फेब्रुवारी २०२६) रोजी सायंकाळी ६ वाजता जि. प. प्राथमिक शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच श्री शनि महाराज मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने प्रख्यात वक्ते भास्कर पेरें पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार असून त्यांच्या प्रभावी विचारांची पर्वणी ग्रामस्थांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर) उपस्थित राहणार आहेत. तसेच सौ. सुरेखाताई मधुकर पवार व सौ. वर्षाताई सारंग पाटील (API, धुळे) यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभणार आहे. शनि महाराज सेवा समिती व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, टाकरखेडा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.