करमाळा शहराच्या पाणीप्रश्नी नगरसेवक रवी जाधव ॲक्शन मोडवर; दहीगाव पंपहाऊसची केली प्रत्यक्ष पाहणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव येथील पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सावंत गटाचे नूतन नगरसेवक रवी जाधव यांनी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व पाणी पुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष दहीगाव पंपहाऊसवर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
सध्या दहीगाव पंपिंग स्टेशनला जेऊर सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र, हे अंतर जास्त असल्याने तांत्रिक बिघाड किंवा नैसर्गिक कारणांमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी रवी जाधव यांनी नगरपरिषद प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या (MSEB) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तांत्रिक दुरुस्ती व पर्यायी व्यवस्थेबाबत चर्चा केली.
आगामी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी रवी जाधव यांनी विशेष पावले उचलली आहेत.
यासाठी त्यांनी करमाळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा अभियंता शितल बहाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्याचप्रमाणे पंपाचे फाउंडेशन स्ट्रक्चरची अवस्था अत्यंत कुचकामी झाली आहे. याबाबत जाधव यांनी फाऊंडेशन स्ट्रक्चरच्या फळ्या बाजूला करून पाहणी केली व याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचारी यांना सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या पाणी नियोजनाचा विषय मांडून त्याला मंजुरी मिळवणार असून प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभागात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १ च्या नागरिकांची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करणार आहे.

“शहराचा पाणीप्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. वीज पुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी प्रशासन आणि वीज वितरण कंपनीच्या सातत्याने संपर्कात आहोत. उन्हाळ्यात माझ्या प्रभागातील आणि शहरातील एकाही नागरिकाला पाण्यासाठी त्रास होणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
— रवी जाधव (नगरसेवक, करमाळा नगरपरिषद)

या पाहणी दौऱ्यामुळे करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुधारण्याची आशा निर्माण झाली असून, रवी जाधव यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!