पं. दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर : विक्की जाधव.
पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार येथील डी. आर. कन्या शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला विशेष रंगत आणली.

चित्रकला स्पर्धेचा विषय पं. दीनदयाल उपाध्याय यांचे व्यक्तिचित्रण तसेच त्यांचा ‘एकात्म मानव सिद्धांत’ व ग्रामीण विकास हा होता. या स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यापैकी उत्कृष्ट ठरलेल्या तीन विद्यार्थिनींची चित्रे जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहेत.
निबंध स्पर्धेत २१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित लेखनातून विद्यार्थिनींनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. यातील तीन निबंध जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवडण्यात आले.
उच्च प्राथमिक गटातील चित्रकला स्पर्धा प्रमुख डी. एन. पालवे यांनी घेतली, तर निबंध स्पर्धेचे नियोजन व मार्गदर्शन सौ. पी. एस. सराफ यांनी केले. उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थिनींच्या सहभागातून पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा परिचय घडवून देण्याचा उपक्रम यशस्वी ठरला