प्रताप महाविद्यालयात ‘अंबवलेले अन्न महोत्सव’ रंगला; ३५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर : विक्की जाधव.
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व Microbiologists Association of India यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Fermented Food’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. एफ.वाय. ते एम.एस्सी.पर्यंतच्या एकूण ३५ विद्यार्थ्यांनी जिवाणू व यीस्ट यांच्या साहाय्याने तयार केलेल्या विविध अंबवलेल्या, पोषक पदार्थांचे आकर्षक सादरीकरण केले. विज्ञान आणि पाककलेचा संगम अनुभवण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली.

स्पर्धेच्या परीक्षक म्हणून गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. नलिनी पाटील यांनी उपस्थित राहून पदार्थांचे परीक्षण केले व पौष्टिकतेबाबत मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. एस. ए. जोशी यांनी अभ्यासक्रमातील संकल्पना कृतीद्वारे शिकविण्याचा हा प्रभावी प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. वैशाली महाजन व विभागातील सहकारी प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले, तर प्रा. हेमलता सूर्यवंशी-भोसले यांनी आभार मानले. उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.