‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’साठी अमळनेर सज्ज; बुधवारी भव्य महाशोभायात्रा

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’साठी अमळनेर सज्ज; बुधवारी भव्य महाशोभायात्रा

अमळनेर : विक्की जाधव.

कृषी क्षेत्रात जनजागृतीचा नवा अध्याय लिहिण्यासाठी ‘माझा संकल्प- भूमी सुपोषण’ चळवळीअंतर्गत बुधवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमात शेतजमिनींचे आरोग्य, सेंद्रिय शेती आणि माती संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.

शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये, विद्यार्थी, सामाजिक व महिला संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सहभागींसाठी प्रारंभी पोटभर नाश्ता तसेच मार्गावर गोळ्या-बिस्किटे व जलपानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळी 8 वाजता संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान येथून महाशोभायात्रेला प्रारंभ होईल. सराफ बाजार, कोंबडी बाजार, राणी लक्ष्मीबाई चौक, मोठा बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड मार्गे यात्रा श्री मंगळग्रह मंदिर, अमळनेर येथे सांगता होईल. मंदिरात सहभागींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, ‘भूमी सुपोषण’चा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!