प्रताप महाविद्यालयात ‘समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’वर मार्गदर्शक कार्यशाळा; संशोधनाची दिशा स्पष्ट
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर इतिहास विभाग व इतिहास संशोधन केंद्र, अमळनेर तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात ‘समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात पार पडली. मानव्य विद्याशाखेअंतर्गत आयोजित या उपक्रमात संशोधन क्षेत्रातील सखोल मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ. अरुण जैन उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कविता राजेंद्र तातेड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रताप तत्त्वज्ञान केंद्राच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. राधिका मोहन पाठक तसेच पारोळा येथील राणी लक्ष्मी बाई महाविद्यालय, पारोळा येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. रावसाहेब नेरकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. कविता तातेड यांनी नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP) मध्ये संशोधनाला प्राप्त झालेले महत्त्व अधोरेखित करत संशोधन प्रक्रियेतील बारकावे PPT सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले. संशोधन शीर्षक निवड, साहित्य पुनर्विलोकन, प्रबंध रचना, शोधनिबंध लेखन, तळटीपा, संदर्भसूची, माहिती संकलन, विश्लेषण, वर्गीकरण, तक्ते व प्रकरण लेखन या सर्व टप्प्यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास रुसा, IQAC व NAAC समन्वयक प्रा. डॉ. मुकेश भोळे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, प्रा. हिमांशू गोसावी यांच्यासह इतिहास विभाग व इतर विभागांचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अवित पाटील यांनी तर आभार प्रा. प्रियंका चावडा यांनी मानले. या कार्यशाळेमुळे संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना नवी दिशा व बौद्धिक बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.