करमाळा पोलिसांची धडक कारवाई: चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल फिर्यादीस सुपूर्द

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- गुन्हेगारीवर वचक निर्माण करत करमाळा पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावून चोरीला गेलेला २ लाख १० हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला हा ऐवज न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादीस परत करण्यात आला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.


करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८८/२०२४ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ)) नुसार सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी संशयावरून रामेश्वर जंगल्या भोसले, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली देत मुद्देमाल आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडून ७ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन फुले असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दागिन्यांची एकूण बाजारपेठ किंमत साधारण २,१०,००० रुपये इतकी आहे.
तपास पूर्ण झाल्यानंतर, जप्त करण्यात आलेले दागिने न्यायालयाच्या परवानगीने फिर्यादी अभिजीत जीवन सरडे रा. कंदर, ता. करमाळा यांना पोलीस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले. आपला चोरीला गेलेला ऐवज पुन्हा मिळाल्यामुळे सरडे यांनी करमाळा पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा मस्के, मनीष पवार, मिलिंद दहीहंडी, अमोल रणदिल, अर्जुन गोसावी, संदीप कवडे आणि रविराज गटकुळ यांचा समावेश होता.
“पोलीस प्रशासन नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सदैव कटिबद्ध असून, गुन्हेगारांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील.”
— करमाळा पोलीस प्रशासन

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!