बोरी नदीच्या पात्रात उजळला महाशिवरात्रीचा दिव्य सोहळा देवाच्या लग्नसोहळ्याने रंगली महाशिवरात्री.
अमळनेर : विक्की जाधव.
वाडी चौक येथील बोरी नदीपात्राच्या मध्यभागी वसलेले सुमारे २५० वर्षे जुने पुरातन पाताळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली.

महादेवाचा मेहंदी कार्यक्रमाचा फोटो
ऐतिहासिक आणि पौराणिक अख्यायिकांनी नटलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पहाटेपासूनच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. “हर हर महादेव”च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.
महादेवाचा हळदी चा फोटो
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, त्यामुळे बोरी नदीच्या पात्रात उजळून निघालेल्या मंदिराचे दृश्य पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली.
शिवरात्रीच्या दोन दिवस आधी मेहंदीचा कार्यक्रम, त्यानंतर हळदीचा सोहळा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी देवाच्या लग्नाचा विधी मोठ्या उत्साहात पार पडला.

महादेवाचा लग्नाचा फोटो
रात्री १२ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम रंगला आणि शेवटी महादेवाची आरती करून उत्सवाची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यासाठी सुभाष मामा पाटील, गुलाब बापू गुरव, संदीप शिंगाणे, सोनु भोई, हर्षल भोई, रमेश भाऊ, सुनिल कोळी, विजय पाटील यांनी मंदिरासाठी आकर्षक लाईटिंगची व्यवस्था करून सहकार्य केले. तसेच वाडी चौक, पैलाड आणि भोईवाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.