न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

सावधान! करमाळ्यात ‘फुलचंद’ पानाची विषवल्ली; शाळकरी मुले व्यसनाच्या जाळ्यात

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- ऐन उमेदीच्या काळात शरीर सुदृढ बनवण्याऐवजी करमाळा शहरातील तरुण पिढी ‘फुलचंद’ पानाच्या जीवघेण्या नशेत अडकत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सातवी-आठवीतील शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांपर्यंत या पानाचे वेड पसरले असून, हे व्यसन त्यांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करत आहे.
‘मस्त वाटते’ किंवा ‘नशा येते’ या भावनेतून तरुण मुले एकमेकांपेक्षा जास्त ‘कडक’ पान बनवून देण्यावर भर देत आहेत. केवळ स्वतःच नाही, तर मित्राची टिंगल-टवाळी करण्यासाठी किंवा त्याची ‘मजा’ पाहण्यासाठी त्याला सक्तीने हे पान खायला देण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. सुरुवातीला गंमत म्हणून खाल्ले जाणारे हे पान कधी कायमस्वरूपी व्यसन बनते, हे या कोवळ्या मुलांना समजतही नाही.


फुलचंद पानातील तीव्र रसायने आणि तंबाखूमुळे थेट मेंदूवर परिणाम होतो. यामुळे मेंदूचे भान हरपते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. सततच्या वापरामुळे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका १०० टक्क्यांनी वाढतो, किशोरवयीन मुलांच्या पचनसंस्थेवर आणि वाढीवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
अनेक पालक आपल्या मुलांच्या बदलत्या वागण्याकडे आणि त्यांच्या खिशातील पैशांच्या खर्चाकडे डोळेझाक करत आहेत. मुले शाळेत किंवा क्लासला गेल्यावर नेमके काय करतात, यावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मुलांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणे हे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे, अशी भीती व्यक्त होत आहे.
करमाळा शहरात अ‍ॅडव्होकेट डॉ.बाबुराव हिरडे यांच्यासारखे ज्येष्ठ समाजसेवक गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी झटत आहेत. व्यसनाधीन झालेल्या मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी स्वतःहून पुढे येऊन अशा अनुभवी समाजसेवकांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनामुळे अनेक तरुण या दलदलीतून बाहेर येऊ शकतात.
“कडक पान खाण्याच्या नादात मुले स्वतःचे आयुष्य अंधारात ढकलत आहेत. आज जरी त्यांना याचे परिणाम जाणवत नसले, तरी भविष्यात हे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरेल. पालकांनी आणि शिक्षकांनी वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे.”
आपल्या मुलाच्या तोंडाचा वास, दातांचा रंग आणि त्याच्या मित्रांची संगत यावर लक्ष ठेवा. ‘फुलचंद’च्या विळख्यातून आपल्या लेकरांना वाचवावे असे आवाहन आम्ही मार्मिक समाचार च्या वतीने आपणास करीत आहोत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!