अमळनेरात ‘भूमी सुपोषण’ जनजागर महाशोभायात्रेची तयारी वेगात

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरात ‘भूमी सुपोषण’ जनजागर महाशोभायात्रेची तयारी वेगात : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची उपस्थिती..

अमळनेर : विक्की जाधव.

अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शहरात ‘माझा संकल्प-भूमी सुपोषण’ जनजागर महाशोभायात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री मंगळग्रह मंदिर येथे आयोजन-नियोजन बैठक होणार असून, खासदार स्मितावाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत.


देशभर ‘भूमी सुपोषण’ चळवळ प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानिमित्त केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान अमळनेर येथे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाशिवरात्रीनिमित्त बैठकीनंतर उपवासाच्या महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!